पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

गेले काही दिवस पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत असून आज पहाटेही पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर असल्याचं सांगण्यात आलं. गेले काही दिवस पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्यामुळं रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पालघर जिल्हा हा भूकंप प्रवण क्षेत्राच्या विभाग ३ मध्ये मोडतो. पालघर मधून हळूहळू भूकंपाचे हे धक्के आता ठाणे आणि पनवेलकडे वळत असल्याचे भूगर्भ शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: