पालघर जिल्ह्यातील काही भागात काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने या परिसरात काहीशी घबराट निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात धुंदलवाडी, बोर्डी, डहाणू, वाणगाव, सास्वंद, अंबोली, कासा, चारोटी आणि आजूबाजूच्या परिसरात 3.6 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. संध्याकाळच्या सुमारास हे धक्के बसल्याने या परिसरात घबराट निर्माण झाली होती. गेल्या काही महिन्यापासून पालघर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के अनुभवाला येत आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
