पाणी फौंडेशन कार्यक्रमातील अनुभव गंमती जंमती प्रेरणादायी किस्से हे पाण्याची गोष्ट कार्यक्रमात ऐकायला मिळणार

पाणी फौंडेशन या कार्यक्रमातील अनुभव गंमती जंमती प्रेरणादायी किस्से हे पाण्याची गोष्ट या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत. पाणी फौंडेशननं वॉटर कप स्पर्धेचं आयोजन करून गावागावांमध्ये लोकसहभागातून जलसंधारणाचं काम केलं. या कामामुळं अनेक गावं दुष्काळमुक्तही झाली आहेत. गेली ३ वर्ष चालू असलेल्या या कार्यात आलेले विशेष अनुभव, गंमती जंमती आणि प्रेरणादायी किस्से हे या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्यक्तींकडून ऐकण्याची आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्याची संधी येत्या शनिवारी मिळणार आहे. विवेकवाडी परिवारानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. १ डिसेंबरला ४ ते ७ या वेळेत केळकर महाविद्यालयाजवळील मराठा मंडळ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रत्यक्ष श्रमदान केलेले गावकरी, आंबेजोगाई ज्ञानप्रबोधिनीचे प्रमुख प्रसाद चिक्षे, पाणी फौंडेशनचे सत्यजित भटकळ संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन विवेकवाडी परिवारातर्फे करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी अमित दातार यांच्याशी ९८३३५ ८९१९७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: