पहिल्या ठाणे फूटबॉल लिगला उद्यापासून सुरूवात

वेस्टर्न इंडिया फूटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ठाणे जिल्हा फूटबॉल संघटनेच्या प्रभारी समितीतर्फे आयोजित पहिल्या ठाणे फूटबॉल लिगला उद्यापासून सुरूवात होत आहे. मुंब्र्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुलात या स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. या फूटबॉल लिगमध्ये १६ संघ सहभागी होणार आहेत. या १६ संघांची २ गटामध्ये विभागणी करण्यात आली असून २ महिने रंगणा-या या लिगमध्ये प्रत्येक संघाला साखळी लढतीमध्ये ७ सामने खेळायला मिळणार आहेत. मुंब्रा युनायटेड आणि मेरिकन एफ सी या दोन संघातील सामन्यानं या लिगचा शुभारंभ होणार आहे.

Leave a Comment