ठाणेकरांनी होळीला वृक्षतोड, पाण्याचा होणारा अपव्यय आणि रासायनिक रंग या सर्व गोष्टी टाळत पर्यावरण पूरक होळी साजरी करावी असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे. होळीसाठी कोणत्याही परिस्थितीत पाण्याचे टँकर दिले जाऊ नयेत असे आदेश महापालिका आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. होळी-धुळवडीच्या वेळी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतो. या पार्श्वभूमीवर कोणालाही पाण्याचे टँकर न पुरवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. दिवसेंदिवस पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन नागरिकांनी वृक्षतोड टाळावी तसंच पाण्याचा बेसुमार वापर करून पाणी वाया घालवू नये. बेसावधपणे रंगाचे फुगे डोक्यावर पडल्यास इजा होऊ शकते म्हणून होळीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
