निवासी परिसरात आरोग्यास धोकादायक ठरणारा रेडीमिक्स सिमेंटचा प्लांट रहिवाशांनी पाडला बंद

कासारवडवलीतील बोरिवडले गावातील रहिवाशांनी त्यांच्या रौनक डिलाईट या इमारतीच्या भिंतीला लागून असलेल्या जागेत चालू असलेले अनधिकृत प्रदूषणकारी आरएमसी प्लांटचे काम बंद पाडले. या सिमेंट मिक्सर प्लांटमुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचं सांगत हा प्लांट त्वरीत बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसैनिकांनी स्थानिक नागरिकांना घेऊन जागेवर जाऊन राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे चालू असलेले अनधिकृत प्रदूषणकारी आरएमसी प्लांटचे काम बंद पाडले. ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक १ बोरिवडले येथील रौनक डिलाईट या निवासी संकुलाच्या बाजूला आरएमसी प्लांटचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. गृहसंकुलांच्या परिसरात अशाप्रकारचा प्रदूषणकारी उद्योग असणे हे धोक्याचे असल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. या प्लांटमुळे ५ हजार रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येणार होते. त्यामुळं आमदार प्रताप सरनाईक यांनी याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं होतं. काल स्थानिक नागरिकांनी आमदार प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत आंदोलन करू नहा प्लांट बंद केला.

 

Leave a Comment

%d bloggers like this: