लोकसभा निवडणुकांमध्ये डिजिटल माध्यमांचा गोंधळ सुरू असतानाच या डिजिटल माध्यमाद्वारेच निवडणूक आयोगानेही लोकसभा निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहितेच, काटेकोर पालन व्हावे यासाठी उपयोग करण्याचे ठरवले आहे. या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग कुठे होत असल्यास त्याची माहिती त्वरित देता यावी यासाठी सिविजील नावाचं ॲप उपलब्ध केल आहे. या सिविजील ॲप मध्ये छायाचित्र अथवा व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा आहे. सिविजील सध्यातरी अँड्रॉइड प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. निवडणुकीमध्ये कुठे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे मतदाराला जाणवल्यास मतदार सिविजील द्वारे याचे छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून तो निवडणूक आयोगाला पाठवू शकतो. या ॲप मध्ये तक्रार गुप्तपणे करण्याचीसुद्धा सुविधा आहे. तक्रार केल्यानंतर तक्रारीवर काय कारवाई केली जाते याची माहितीही तक्रारदाराला मधूनच मिळणार आहे. या ॲप मध्ये तक्रार केल्यानंतर तक्रारदाराच्या तक्रारीवर शंभर मिनिटाच्या आत कारवाई होणार आहे. निवडणू कित होणारे पैसे वाटप, मतदारांना दिली जाणारी आमिष, मतदारांना दमदाटी, अथवा मारहाण, पेड न्यूज, मतदानात होणारे गैरव्यवहार अशा विविध बाबींचा तक्रारी सिविजील ॲप द्वारे थेट निवडणूक आयोगाकडे करता येणार आहे. या ॲप मध्ये केलेल्या तक्रारीची दखल घेतली न गेल्यास तक्रार आपोआप राज्य आणि राज्य स्तरावर दखल न घेतल्यास त्याची दखल आपोआप केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतली जाणार आहे, अशी सुविधा यात असल्याचे ठाण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
