धनादेशाचा अनादर झाल्यास होणा-या दंडात महावितरणनं केली वाढ

महावितरणनं धनादेशाचा अनादर झाल्यास होणा-या दंडात वाढ केली आहे. वीज भरणा करताना दिलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर म्हणजे धनादेश न वटल्यास होणारा दंड आता साडेतीनशे रूपयांवरून दीड हजार रूपये करण्यात आला आहे. महावितरणच्या १६ परिमंडळातील पावणे सहा लाखाहून अधिक लघुदाब वीज ग्राहक हे धनादेशाद्वारे दरमहा ५४२ कोटी रूपयांच्या वीज बीलाचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे १० हजार धनादेश विविध कारणांमुळे वटत नाहीत. त्यासाठी यापूर्वी वीज ग्राहकांना साडेतीनशे रूपये दंड लावला जात असे. मात्र गेल्या महिन्यापासून या दंडाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: