दिवाळीत रात्रीचे अवघे दोन तासच फटाके फोडता येणार

यंदाच्या दिवाळीत फटाके रात्रीचे अवघे दोन तास फोडता येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या एका निर्णयामुळे आता फटाके हे रात्री ८ ते १० या वेळातच उडवता येणार आहेत. न्यायमूर्ती ए. के. सिक्री आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात फटाक्यांवर बंदी घालावी या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निकाल दिला. फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावताना न्यायालयानं फटाक्यांचे विक्रेते आणि उत्पादकांवर काही निर्बंध लावले आहेत. फटाक्यांच्या ऑनलाईन विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली असून त्यावर काही निर्बंधही लावले आहेत. बंदी घातलेले फटाके जर ई-कॉमर्स कंपन्यांनी ऑनलाईन विकले तर त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान या आरोपाखाली कारवाई होणार आहे. न्यायालयानं फटाके उडवण्यावर निर्बंध घातले असून दिवाळीच्या दिवसात रात्री ८ ते १० तर ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुरूवातीला रात्री पावणे बारा ते सव्वा बारा या काळातच फटाके उडवता येणार आहेत.

 

Leave a Comment

%d bloggers like this: