दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील नुतनीकृत खेळपट्टीचं उद्घाटन

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनावर तयार करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील नुतनीकृत खेळपट्टीचं उद्घाटन काल पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. क्रिकेट मैदानासाठी ७० मीटर परिघाची सीमारेषा आखण्यात आली असून मैदानात ऑस्ट्रेलियातील बर्मुडा गवताचं रोपण करण्यात आलं आहे. मैदानात पाण्याची फवारणी करण्यासाठी सध्या ७२ भूमिगत फवारे बसवण्यात आले आहेत. पाण्याचा शिडकावा करायचा असेल तेव्हा ते जमिनीतून आपोआप वरती येऊन हवा तितकाच पाणी पुरवठा केला जातो. मैदानात एक मुख्य खेळपट्टी बरोबरच सरावासाठी ३ अतिरिक्त खेळपट्ट्या निर्माण करण्यात आल्या आहेत. मुख्य खेळपट्टीजवळ तिस-या पंचासाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यंदाच्या आयपीएलच्या सामन्यातील काही संघ या मैदानात सराव करणार असून कलकत्ता नाईट रायडरची टीम पुढच्या आठवड्यात तीन दिवस मैदानात सराव करणार आहे. कालच्या पहिल्या सामन्यात बाणेदार ठाणे संघ विजयी झाला. तर दुस-या सामन्यात खतरनाक मुळशी संघ आणि अंतिम सामन्यात मिडीया लढवय्याचा संघ विजयी झाला. या तीन सामन्यात मिडीया लढवय्याचा अनिकेत पाटील, बाणेदार ठाणेचा संदीप जुवाटकर तर खतरनाक मुळशीचा उदय पाटील यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading