तरूण पिढीनं अवयव दानाविषयी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा – विवेक फणसळकर

तरूण पिढीनं अवयव दानाविषयी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केलं आहे. अवयवदान दिनानिमित्त अवयवदान जनजागृती महारॅली काढण्यात आली होती. या महारॅलीचा शुभारंभ पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी रॅलीतील सहभागी तरूण तरूणींना मार्गदर्शन करताना त्यांनी हे आवाहन केलं. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्र, फोर्टीज् इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग, शतरंगी ग्रुप, सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, सेंट जॉन बाप्टिस्ट ज्युनियर कॉलेज, राजीव गांधी मेडिकल कॉलेज, किमया किडनी केअर ग्रुप, आर. जे. ठाकूर महाविद्यालय आदी संस्थांबरोबरच हजारो विद्यार्थी, एनएसएस, डॉक्टर्स, नर्सेस, महिला, बँडपथक, अवयवदान चित्ररूपी बग्गी आदींचा या महारॅलीत सहभाग होता. अवयवदान नोंदणी उपक्रमांतर्गत १३४७ अवयवदान आणि देहदानाचे अर्ज भरले गेले.

Leave a Comment