डॉ. महेश बेडेकर यांनी जपानमधील मॅरेथॉन स्पर्धा ३ तास २५ मिनिटात केली पूर्ण

ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर महेश बेडेकर यांनी जपानमधील मॅरेथॉन स्पर्धा ३ तास २५ मिनिटात पूर्ण केली आहे.

अलीकडेच मुंबईत झालेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. 42 किलोमीटरचं अंतर त्यांनी तीन तास तेवीस मिनिटात पूर्ण केलं. या टायमिंग मुळे ते शिकागो येथे होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. गेल्यावर्षी लंडन येथे झालेल्या मॅराथॉन स्पर्धेत त्यांनी 42 किलोमीटरचं अंतर तीन तास 30 मिनिटात पूर्ण केलं होतं. गतवर्षीच्या तुलनेत त्यांनी यंदा हे अंतर सात मिनिट कमी वेळात पूर्ण केल आहे, शिकागो मॅरेथॉन ऑक्टोबरमध्ये होणार असून त्यापूर्वी मार्च महिन्यात झालेल्या जपान मॅराथॉन स्पर्धेत डॉक्टर महेश बेडेकर सहभागी झाले होते. या मॅरेथॉनमध्येही त्यांनी आपल्या पूर्वीच्या वेळेपेक्षा हे अंतर २ मिनिटं कमी वेळ देत पार केलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: