ठाण्यामध्ये एका २७ वर्षीय युवतीनं आत्महत्या करण्याचा प्रकार घडला आहे. कोलशेत येथील एव्हरेस्ट वर्ल्ड या इमारतीत राहणा-या शमिस्ता सोम या युवतीनं १२व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिने नेमकी आत्महत्या का केली याचं कारण समजू शकलं नाही. मात्र तिनं आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं सांगितलं. शमिस्ताची आई ठाण्यातील प्रसिध्द त्वचारोग तज्ञ आहे. डॉ. कावेरी सोम यांचे नौपाडा आणि वर्तकनगर येथे दवाखाने आहेत. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/01/WhatsApp-Image-2019-01-05-at-4.21.04-PM.jpeg)