ठाण्यात महालक्ष्मी पूजन उत्साहात साजरे

सध्या नवरात्रौत्सव सुरू असून या नवरात्रौत्सवात अष्टमीला विशेष महत्व असतं. अष्टमीच्या दिवशी होमहवन केलं जातं तसंच कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये महालक्ष्मी पूजन केलं जातं. नविन लग्न झालेल्या स्त्रिया मंगळागौरी व्रताप्रमाणे महालक्ष्मीचीही ५ वर्ष पूजा करतात. काल ठाण्यामध्ये महालक्ष्मी पूजन आयोजित करण्यात आलं होतं. संध्याकाळी महालक्ष्मी पूजनानंतर समस्त नागरिकांना आणि घागरी फुंकणा-या देवी भक्तांना श्री महालक्ष्मीच्या दर्शनाचा लाभ झाला. जवळपास दोन ते अडीच हजार महिलांनी या महालक्ष्मी दर्शनाचा लाभ घेतला. ठाण्यातील ब्राह्मण सेवा संघात महालक्ष्मी पूजन आणि घागरी फुंकण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

Leave a Comment

%d bloggers like this: