ठाण्यातील पहिल्या फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते

ठाण्यातील पहिल्या फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. प्रभाग क्रमांक 19 मधील कचऱ्याचे साम्राज्य असणार्या जागेवर हे फुलपाखरू उद्यान उभारण्यात आल आहे. या उद्यानात फुलपाखरू आकर्षित करण्यासाठी पेंटास, करवंद, हळदी कुंकू, पावडर पफ, एक्सरा, पिंक, रेड ही झाडे लावण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे रफिज पामची झाडे लावण्यात आली असून या झाडात फुलपाखरं लपून राहतात, या उद्यानात नागरिकांना फिरण्यासाठी पदपथ, हैंगिंग ब्रिज उभारण्यात आले आहेत. नागरिकांसाठी खुली व्यायामशाळा तयार करून विविध सुविधांनी परिपूर्ण असे उद्यान तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर पांढरे, लाल, निळे, पिवळे, गुलाबी अशा विविध रंगाच्या फुलांसाठी पाण्याची डबकी तयार करण्यात आली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: