ठाण्यातील एका कारागिरानं सहा फुटी महाकाय कोल्हापुरी चप्पल तयार केली आहे. विशेष म्हणजे ही चप्पल तयार करण्यासाठी त्यांनी कोणतीही यंत्रसामुग्री वापरलेली नाही. आजपासून ही चप्पल सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली असून या चप्पलेसोबत सेल्फीही घेता येणार आहे. कोल्हापुरी चप्पला सर्वत्र प्रसिध्द असून भारतीय पेहरावाच्या वेळी विशेषकरून कोल्हापुरी चप्पल घातल्या जातात. ठाण्यातील अंकुश कारंडे यांनी ही सहा फुटी चप्पल तयार केली आहे. टेंभीनाका येथे त्यांचं चप्पलेचं दुकान आहे. सुरूवातीला त्यांनी चप्पलेचं चित्र तयार केलं आणि त्यावरून चप्पल तयार केली. ही चप्पल तयार करण्यासाठी त्यांना १५ दिवस लागले आणि यासाठी २५ हजार रूपयांचा खर्च आला. ही चप्पल तयार करण्यासाठी त्यांच्या बारा वर्षीय आर्यन या मुलानेही त्यांना मदत केली. कोल्हापुरी चप्पलेचा ट्रेंड नागरिकांमध्ये वाढावा यासाठी ही चप्पल तयार केल्याचं अंकुश कारंडे यांनी सांगितलं.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/10/cHAPPAL-2.jpeg)