ठाण्यातील इंडिया अनबाऊंड या न्यूज पोर्टलच्या संपादकाची हत्या

ठाण्यातील इंडिया अनबाऊंड या न्यूज पोर्टलच्या संपादकाची हत्या झाली आहे. भिवंडीतील एका पूलाखाली नित्यानंद पांडे यांचा मृतदेह पोलीसांना मिळाला. पांडे यांच्या डोक्यात मारहाणीच्या खुणा असून त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच ही बाब स्पष्ट होऊ शकेल असं पोलीसांकडून सांगण्यात आलं. पांडे यांचा मोबाईल शुक्रवारी रात्री साडेसात नंतर बंद झाला होता. ते घरीही न आल्यामुळं अखेर त्यांच्या कुटुंबियांनी पोलीसांकडे तक्रार नोंदवली होती. पोलीसांनी त्यांच्या कुटुंबियांकडून भिवंडी येथील पूलाखालील मृतदेह हा पांडे यांचाच असल्याची खात्री करून घेतली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पांडे यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: