ठाणे सिटी एफ सी संघाची ठाणे फूटबॉल लीग स्पर्धेत विजयी सलामी

ठाणे सिटी एफ सी संघाने श्री माँ गुरूकुल संघाचा ४-० असा फडशा पाडत विफा ठाणे जिल्हा फूटबॉल संघटनेच्या प्रभारी समिती आयोजित ठाणे फूटबॉल लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली. विजेत्या संघाच्या दर्शन शेट्टीने सामन्याच्या सुरूवातीलाच तिस-या आणि तेराव्या मिनिटाला गोल करत संघाला समाधानकारक आघाडी मिळवून दिली. या आघाडीत आदित्य पगारनं १६व्या मिनिटाला गोल करत भर टाकली. विनय तावडेने ३७व्या मिनिटाला गोल करत संघाला आणखी बळकटी मिळवून दिली. पराभूत संघाच्या आक्रमकांनी काही चांगल्या चाली रचल्या. पण गोल करण्यात त्यांना यश मिळालं नाही. अन्य लढतीत लायकांस संघाने यंग गन्स संघाचा २-१ असा पराभव केला. पियुष मिश्राने खेळातील दुस-या मिनिटालाच लायकांस संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हल्ले प्रतिहल्ले चढवत गोल करण्याचे प्रयत्न केले. त्यात सौरभ मिश्राला ४७व्या मिनिटाला संघाच्या आघाडीत भर टाकण्यात यश आलं. पराभूत संघाचा एकमेव गोल सुमितने ५८व्या मिनिटाला नोंदवला. एफएलए श्री माँ संघाने प्रहार युनायटेड संघाचा ७-१ असा धुव्वा उडवला. विजयी संघाच्या अनंत आणि एल्टनने प्रत्येकी दोन गोल केले. तर एरॉन, सात्विक आणि अखिलेशने प्रत्येकी एक गोल केला. आनंद भारती समाज आणि सहारा बॉईज एफ सी या संघातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading