ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ५ अधिकारी निलंबित झाल्याचा सर्वसामान्य माणसांना फटका

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ५ अधिका-यांच्या निलंबनामुळे परिवहन कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्यानं त्याचा सर्वसामान्य माणसाला त्रास झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार परिवहन विभागाच्या ३७ अधिका-यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. या ३७ अधिका-यांमध्ये ५ अधिकारी ठाण्यातील होती. या अधिका-यांच्या निलंबनामुळे प्रादेशिक कार्यालयातील कामकाजावर त्याचा परिणाम झाला. प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाने अथवा तत्सम कामासाठी आलेल्या मंडळींना त्याचा फटका बसला आहे. अधिकारीच काम करायला नसल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. कार्यालयामध्ये शुकशुकाट जाणवत होता. याप्रकरणी काही नागरिकांनी शिवसेनेकडे केलेल्या तक्रारीनुसार शिवसेनेनं पुढाकार घेऊन याबाबत परिवहन अधिका-यांना जाब विचारला. आमच्याकडे यंत्रणा कमी आहे. आम्ही यावर काय करायचं, लोकांना आगाऊ कल्पना देण्यासाठी सुध्दा कर्मचारी नाही असं कार्यालयातून सांगितलं जात होतं. २ दिवसात यावर तोडगा काढावा आणि एसएमएसद्वारे नागरिकांना पूर्वकल्पना द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं प्रादेशिक परिवहन अधिका-यांकडे केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: