ठाणे पूर्व परिसरात नियोजित सेंद्रीय खत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

ठाणे पूर्व परिसरात नियोजित सेंद्रीय खत प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. ठाणे पूर्व परिसरात गणपती विसर्जन घाटाजवळील महावितरण पॉवर हाऊसच्या जवळील जागेत महापालिका १ टन कच-यापासून सेंद्रीय खत निर्माण करण्याचा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. पालिकेनं या ठिकाणी चर खणले असून आवश्यक ती साधनसामुग्रीही आणून ठेवली आहे. मात्र स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर काम थांबल्याचं दिसत आहे. कोपरीकर आधीच मुलुंडमधील डंपिंग ग्राऊंडमुळे हैराण झाले असताना आता अगदी भर वस्तीतील या प्रकल्पाला तीव्र विरोध सुरू केला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: