ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पाठपुराव्यानं ॲपलॅब सर्कल ते टिप टॉप हॉटेल या दरम्यानच्या फुलझाडांचं पुनर्वसन होणार

ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पाठपुराव्यानं ॲपलॅब सर्कल ते टिप टॉप हॉटेल या दरम्यानच्या फुलझाडांचं पुनर्वसन होणार आहे. ठाणे शहरामध्ये मेट्रो ४ चे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वडाळा ते कापुरबावडी या मेट्रो मार्गामध्ये अनेक झाडं तसंच हरित जनपथ मधील शोभिवंत फुलझाडे विस्थापित होणार आहेत. मेट्रो ४ च्या अधिका-यांनी खोदकाम करताना या झाडांच्या पुनर्वसनाकडे लक्ष न दिल्यानं ही फुलझाडं मरण्याच्या अवस्थेत पोहचली होती. ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या कौस्तुभ दरवेस यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. महापालिकेच्या उद्यान विभागानं तत्परता दाखवत अॲपलॅब सर्कल ते टिप टॉप हॉटेल दरम्यानच्या साडेचारशे मीटरच्या रस्ते दुभाजकातील फुलझाडांचे पुनर्वसन करण्याचे मान्य केले. त्याचबरोबर पुढील काळात मेट्रो मार्गामुळे विस्थापित होणा-या प्रत्येक फुलझाडाचे संरक्षण करण्याचं आश्वासन उद्यान विभागानं दिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading