ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्थलांतरास शासनाने मंजुरी दिली आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे जुन झाल असून या रुग्णालयाची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे आहे त्या ठिकाणी नवीन आणि अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा गेली अनेक वर्षापासून चर्चा सुरू आहे. मात्र आता शासनाने सध्याच्या रुग्णालयाचे काही विभाग मनोरुग्णालय येथील इमारतीत स्थलांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील ठाणेकरांसाठी जिल्हा रुग्णालय हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात ,आता रुग्णालयाचे स्थलांतर होणार असल्यामुळे रुग्णांना विविध ठिकाणी जावे लागणार आहे. मनोरुग्णालय येथील नव्यान बांधलेली इमारत, भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालय ठाणे महापालिकेचा आरोग्य केंद्र अशा विविध ठिकाणी स्थलांतर केले जाणार आहे. रुग्णालयाच स्थलांतर झाल्यानंतर आहे त्या ठिकाणीच अत्याधुनिक आणि सध्या पेक्षा मोठे रुग्णालय उभारला जाणार आहे.