ठाणे जिल्हा परिषदेचा १०१ कोटी ७९ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर

ठाणे जिल्हा परिषदेनं १०१ कोटी ७९ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर केला आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ३५ कोटींची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ६५ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. नंतर सुधारीत अर्थसंकल्प साडेअठठ्याहत्तर कोटींचा झाला होता. अर्थसमितीचे सभापती सुभाष पवार यांनी हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर केला. दिव्यांगांसाठी तीन चाकी स्कूटी या योजनेसह शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशु संवर्धन आणि ग्रामपंचायतीशी संबंधित अनेक योजना सादर करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: