ठाणे जिल्हा केबल सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

नव्या वर्षात आता ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल पाहण्याची आणि जे चॅनेल पाहतोय त्याचेच पैसे देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परंतु, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) या निर्णया विरोधात ठाणे जिल्हा केबल सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

केबल चालकांना ४० टक्के कमीशन मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ट्राय ना अलीकडेच केबल चॅनल साठी नवीन दाराची गोष्ट केली आहे. नवीन वर्षापासून हे दर लागू होणार आहे मात्र यामध्ये केबल चालकाचं नुकसान असल्याचं केबल चालकांचे म्हणणे आहे. प्रत्येक चॅनेल साठी आता स्वतंत्र पैसे मोजावे लागणार असून असून ग्राहकांना फक्त हवे तेवढेच चॅनलचे पैसे देऊन हवे तेवढे चॅनल पाहता येतील. यात जरी ग्राहकांचा फायदा असला तरी केबल चालकांना मात्र फटका बसणार आहे. केबल शुल्काच्या रक्कमेपैकी चॅनेल साठी 80 ट्क्के तर उर्वरित 20 टक्के एम एस ओ आणि स्थानिक केबल चालकाला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे इतक्या कमी पैशात व्यवसाय कसा करायचा असा केबल चालकांचा प्रश्न आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली.आणि आपल्या मागण्यांचे एक निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

 

Leave a Comment

%d bloggers like this: