ठाणे कारागृहातील बंदिवानांनी केक विक्रीतून कारागृहाला मिळवून दिलं ५ लाखांचं उत्पन्न

ठाणे कारागृहातील १३ बंदिवानांनी १ हजार ८१४ किलो केक तयार करून ठाणे कारागृहाला सुमारे ५ लाखांचा महसुल मिळवून दिला आहे. ठाणे कारागृहातील १३ बंदिवानांनी बेकरी प्रोडक्ट प्रशिक्षक निशा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे केक तयार केले होते. ठाणे कारागृहात एक बेकरी असून जिथे बेकरी उत्पादनं तयार केली जातात. बाजारभावापेक्षा कमी किंमतीत केकची विक्री होत असल्यामुळं या केकला मागणी असते. कप केकसाठी ७ रूपये तर स्पंज केकसाठी किलोमागे दीडशे रूपये आकारले जातात. यापोटी कैद्यांना त्यांच्या कामाचे रोज पैसे दिले जातात. ठाणे कारागृहात तयार होणा-या बेकरी उत्पादनाला चांगली मागणी असून मनोरूग्णालय तसंच अगदी मंत्रालयापर्यंत ही उत्पादनं पुरवली जातात. या उत्पादनाच्या विक्रीतून मिळणा-या महसुलातून येथील बंदिवानांचं पुनर्वसन केलं जातं.

Leave a Comment

%d bloggers like this: