टेनिसच्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याला ३ पदकं

भारतीय शालेय खेल संघटनेच्या अंतर्गत झालेल्या टेनिसच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत राज्याला ३ पदकं मिळवून दिली आहेत. बंगलोर येथे झालेल्या या स्पर्धेत भारतातील एकूण १३ विभागातील खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून १० मुलं आणि ८ मुली अशा १८ जणांची निवड करण्यात आली होती. ज्येष्ठ आणि कनिष्ठ गटात राज्याचे प्रतिनिधीत्व करून या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं आहे. कनिष्ठ गटात मुलांमध्ये आदिर्य तटकरे, करीम खान, साहेब सोधी, पार्थ नेहे, एन्जॉय बॅनर्जी यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्याला सुवर्णपदक मिळालं. मुलींच्या कनिष्ठ गटात साची पटवर्धन, कुंडली माजगाणे, रिजुल सिद्राले, आर्य झालटे यांनी रौप्य पदक पटकावलं. ज्येष्ठ गटात पार्थ घारपुरे, राज पारेख, आर्यन पटेल, अनमोल कोठारी, प्रणव महर्षी यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: