टपाल खात्याच्या ठाणे विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व टपाल शाखांचा महामेळाव्यात अकरा हजार नवीन खाती

टपाल खात्याच्या ठाणे विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व टपाल शाखांचा एक महा मेळावा ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्यात अकरा हजार नवीन खाती उघडण्यात आली. मुख्य पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे या महामेळाव्यास उपस्थित होत्या. या महामेळाव्यात सहा कोटींचे आरटीएलाय, पी एल आय प्रस्ताव काढले गेले. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यामहा मेळाव्याच्या निमित्ताने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर सर्वात जास्त खाती मिळवून देणाऱ्या नूतन बसवंत यांचा खास गौरव करण्यात आला ,आणि त्यांना दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. याचवेळी टपाल खात्याला सर्वात जास्त खाते आणि विमा रक्कम मिळवून देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

%d bloggers like this: