झाडे तोडणे/पुनर्रोपण करणे या संदर्भात शंकानिरसन करण्यासाठी एकत्रित जनसुनावणी घेण्याची मागणी

मौजे कौसा येथील जोड रस्त्याचे बांधकाम करताना तेथील बाधित होणारी झाडे तोडणे/पुनर्रोपण करणे या संदर्भात सर्वांचे शंकानिरसन करण्यासाठी एकत्रित जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य विक्रांत तावडे आणि नम्रता भोसले-जाधव यांनी केली आहे. ठाणे महापालिका वृक्षप्राधिकरण विभागाचे वृक्ष अधिकारी तथा सहाय्यक आयुक्तांना या संदर्भात निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. मौजे कौसा, एम.एम.आर.डी.एच्या वतीने जोडरस्त्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम करताना त्या ठिकाणी बाधित होणारी 2874 झाडे तोडणे तसेच त्यांचे पुनर्रोपण करण्याबाबत वर्तमानपत्रात ठाणे महापालिकेच्या वतीने जाहीरात प्रसिद्ध करून यासंदर्भात हरकती/आक्षेप/सूचना मागविण्यात आल्या आहेत.या जाहिरातीच्या अनुषंगाने नागरिक, वृक्षप्रेमी आणि समाजसेवकांनी आवाज उठविल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील झाले आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड/पुनर्रोपण करण्यात येणार असल्याने पर्यावरणाचा समतोल कशा पद्धतीने राखला जाणार आहे हे जनतेला ज्ञात होणे आवश्यक आहे. याकरिता एकत्रित जनसुनावणी घेऊन सर्वांचे शंकानिरसन करावे अशी मागणी विक्रांत तावडे आणि नम्रता भोसले-जाधव आणि अन्य सदस्यांनी केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: