जोशी-बेडेकर महाविद्यालयातील सौरभ चव्हाणची १४व्या राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थी सौरभ चव्हाणची १४व्या राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. सौरभ हा जोशी बेडेकर महाविद्यालयात बीएमएस तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय संघातील उत्कृष्ट वक्ता म्हणून त्याला गौरवण्यात आलं. मुंबई विद्यापीठानं राष्ट्रीय पातळीवर चौथा क्रमांक पटकावला. संसदीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांच्या हस्ते नुकतेच या स्पर्धेचं पारितोषिक वितरण संपन्न झालं. विकसनशील भारताच्या उत्कर्षाला तरूणांनी हातभार लावावा, तरूणांच्या विचारांना व्यासपीठ मिळावं तसंच त्यांना संसदीय कामकाज प्रत्यक्ष अनुभवता यावं यासाठी राष्ट्रीय युवा संसदेचं आयोजन केले जाते. महाविद्यालय, विद्यापीठ आणि त्यानंतर विद्यापीठाच्या राष्ट्रीय संघात निवड अशा अनेक चाचण्यातून राष्ट्रीय युवा संसदेसाठी विद्यार्थ्याची निवड केली जाते. या यशात सौरभची मेहनत आणि जिद्द महत्वाची होतीच पण महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक, प्रज्ञा राजेबहाद्दूर, विमुक्ता राजे, मुंबई विद्यापीठाच्या युवा संसदेचे समन्वयक हर्षद भोसले आणि त्यांच्या सहका-यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading