जिल्ह्यातील ११० शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे दोन ते चार महिन्याचे वेतन अखेर शिक्षकांच्या खात्यात जमा

ठाणे जिल्ह्यातील ११० शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे दोन ते चार महिन्याचे वेतन अखेर भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे कोकण आणि मुंबई
विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांच्या खात्यात जमा झाले.
ठाणे जिल्ह्यातील ११० अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये केले असून अद्याप शिक्षकांना शाळा देण्यात आल्या नसून त्यांचे वेतनही ठप्प झाले. याबाबत भाजपा प्रदेश
शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली काही शिक्षकांनी वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथक ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक सुनिल
सावंत यांच्याशी चर्चा करून शिक्षकांना वेतन न मिळाल्याने त्यांचे गृह कर्जाचे हफ्ते आणि विम्याच्या हप्त्यांवर कंपन्या दंड आकारात असून
शिक्षकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत असून उसनवारी करावी लागत असल्याचे निदर्शनास आणून तातडीने शिक्षकांचे वेतन अदा
करण्याची मागणी केली होती. त्यावेळी अधीक्षकांनी सर्व प्रलंबित बिले ट्रेझरी मध्ये पाठवितो असे आश्वासन दिले होते. याबाबत अनिल बोरनारे यांनी
पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पाठपुराव्यामुळे शिक्षकांना त्यांचे वेतन मिळाले आहे.

ठाणे, पालघर, रायगड, बृहन्मुंबई उत्तर, पश्चिम व दक्षिण
विभागातील ज्या अतिरिक्त शाळेमधील शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून निघत आहे अशा शिक्षकांची ७ व्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती कुणी
करावी असा प्रश्न निर्माण झाला होता या प्रश्नाबाबतही अनिल बोरनारे यांनी काल मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्यासोबत चर्चा
केली आणि अतिरिक्त शिक्षकांची वेतन निश्चिती मूळ शाळेतून करण्याची मागणी केली त्यावर शिक्षण उपसंचालकांनी त्वरित लेखी आदेश देऊन
अतिरिक्त शिक्षकांची वेतन निश्चिती मूळ शाळेतून करावी असे आदेश काढले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading