जिल्ह्यातील १०७ अपघातग्रस्त ठिकाणांची यादी प्रसिध्द

जिल्ह्यातील १०७ अपघातग्रस्त ठिकाणांची यादी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्द केली असून यामध्ये राज्य महामार्गावर २३ तर राष्ट्रीय महामार्गावर ४५ अपघातांची ठिकाणं आहेत. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर खिंड, दिल्ली दरबार हॉटेल, दिवा पेट्रोल पंप, ओवळा गाव, खारेगाव टोलनाका, माणकोली नाका, आर सी पाटील गॅप, अरूणकुमार कावरी, दिवा गाव, खारेगाव ब्रीज, पिंपळास फाटा, माजिवडा, राजनोली फाटा तर राज्य महामार्गावर कोपरी सिग्नल, कशेळी ब्रीज, आंजूर फाटा, ओवळा, आनंदनगर ते विजय गार्डन सिग्नल, वाघबीळ ते डोंगरीपाडा, पातलीपाडा ते ब्रह्मांड, मानपाडा ते दोस्ती, आर मॉल ते तत्वज्ञान विद्यापीठ, कळवा शिवाजी चौक ही अपघाताची ठिकाणं या यादीत देण्यात आली आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: