जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातील तीन हजाराहून अधिक अनधिकृत फलक ,पोस्टर्सवर कारवाई

लोकसभा निवडणूक पूर्व स्वच्छता अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातून जवळपास तीन हजाराहून अधिक फलक झेंडे काढण्यात आले. ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोस्टर्स, झेंडे आणि होर्डिंग खाली उतरवण्यात आली. आदर्श आचारसंहिता अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले हे झेंडे, बॅनर होते. या कारवाई अंतर्गत कोपरी-पाचपाखाडी, कल्याण -पश्चिम, आणि कल्याण ग्रामीण या मतदारसंघांमध्ये असे फलक, झेंडे जास्ती लावण्यात आले होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत साडेनऊशेहुन अधिक अनधिकृत फलक आणि झेंडे काढण्यात आले, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात दीड हजारावर अधिक फलक. मोठी होर्डिंग उतरवण्यात आली तर ठाणे लोकसभा मतदारसंघात जवळपास साडे सहाशे पोस्टर्स आणि होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

%d bloggers like this: