जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. भारतीय प्रजासत्ताकाच्या ६९व्या वर्धापन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राज्य राखीव दल, ठाणे शहर पोलीस, वाहतूक पोलीस, कारागृह रक्षक, गृहरक्षक, कमांडो पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, दंगारोधक पथक, निवडणूक विभाग, प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्मार्ट सिटी, ५० कोटी वृक्ष लागवड अशा विविध विभागांच्या चित्ररथामुळे कार्यक्रमात रंगत आली होती. वातावरण बदलामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा उपद्रव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाईल. नागरिकांनी काळजी करू नये, आपली आरोग्य यंत्रणा याचा व्यवस्थित मुकाबला करेल. तापाची किंवा इतर लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे असं आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading