जिद्द मुलांच्या शाळेत होलिका उत्सवा बरोबरच धुळवड खेळून मराठी कलाकारांनी आनंद केला द्विगुणित

ठाण्यात जिद्द मुलांच्या शाळेत होलिका उत्सवा बरोबरच धुळवड खेळून मराठी कलाकारांनी आपला आनंद द्विगुणित केला. या बरोबरच या विशेष मुलांबरोबर त्यांनी आनंद लुटला तो मराठी आणि हिंदी गाण्यावर नाचून. ठाण्यातील वसंत विहार परिसरात महानगर पालिकेच्या जिदद शाळेत उत्सवाच्या निमित्ताने कलाकारांनी हजेरी लावली होती. ठाण्यातील विठाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या होलिकोत्सवाचं यंदाचं १३ वे वर्ष होत. ठाणे महानगर पालिकेच्या वसंत विहार शाळेत होळीच्या पूर्व संध्येलाच होलीकाउत्सवा बरोबरच धुळवड देखील खेळण्यात आली. शाळेच्या प्रांगणात खास पर्यावरणभिमुख होळीच दहन करण्यात आलं त्या बरोबरच शाळेतील विशेष मुलांनी कलाकारांच्या बरोबर धुळवडही साजरी केली. धुळवड साजरी करत असताना नैसर्गिक रंगांचा खास वापर करण्यात आला होता. होळी बरोबरच धुळवडीचा उत्साह म्हणजे एकमेकांमध्ये मिसळण्याचा क्षण. या मुलांबरोबर होळी खेळण्याचा आनंद वेगळाच असल्याच्या भावना सहभागी असणाऱ्या कलाकारांनी यावेळी व्यक्त केल्या.

Leave a Comment

%d bloggers like this: