जगातील १ कोटी लोकांना भारतीय शास्त्रीय संगीत ऐकवण्याचं स्वप्न – महेश काळे

जगातील १ कोटी लोकांना भारतीय शास्त्रीय संगीत ऐकवण्याचं स्वप्न आपण पाहत आहोत. यासाठी दीड लाख लोकं एकाच वेळी ऐकतील असा कार्यक्रम करण्याचं आपलं स्वप्न असून इंडियन क्लासिकल ॲण्ड म्युझिक आर्टस् द्वारा ५० हजार मुलांना संगीत शिकवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न आहे अशी आपली स्वप्न असून यासाठीच इंडियन क्लासिकल ॲण्ड म्युझिक आर्टस् ही संस्था सुरू करण्यात आल्याची माहिती लोकप्रिय गायक महेश काळे यांनी दिली. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत सूर निरागस हो या विषयावर बोलताना महेश काळे यांनी ही माहिती दिली. अमेरिकेत शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचाराचं काम करण्यासाठी ही संस्था स्थापन केली. भारतीय शास्त्रीय संगीताला प्रतिष्ठा मिळायला हवी. कलाकारांची बेअदबी होणार नाही हे पहावे, गाण्याचं तिकिट काढलं म्हणजे कलाकृतीचे पैसे नाही मोजत तर ॲक्सेसचे पैसे मोजतो आपण, कलाकारांचा विश्वास, मर्जी सांभाळणं गरजेचं असल्याचं महेश काळे यांनी सांगितलं. सध्या ५ ते ६ विद्यार्थी आपल्या संस्थेनं दत्तक घेतले आहेत. संगीत कलेतील अशा ५० हजार मुलांना मदत करता आली तर त्यातून एक भीमसेन जोशी मिळवता येईल असं महेश काळे यांनी सांगितलं. शिक्षक हा मुलांना घडवत असतो. आई-वडील आणि देवापेक्षाही तो मोठा असतो. वेळ जात नाही म्हणून शिक्षक शिकवत असेल तर ते गाणं योग्य होणार नाही असं महेश काळे यांनी सांगितलं. शाळेत संगीत शिकवावं म्हणून मोर्चा का नाही काढला जात ? टीव्हीवर शास्त्रीय संगीत आहे का ? फोन, टीव्ही, रेडीओ या माध्यमांवर सकस अभिजात शास्त्रीय संगीताचा एकतरी वर्ग असावा. यामुळं संगीत शिकत नाही म्हणून तरूण पिढीला दोष कसा देता येईल असा प्रश्न उपस्थित करून तरूण पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी थिंक टँक बांधण्याची गरज महेश काळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. महेश काळे यांनी सूर निरागस हो, विठ्ठल विठ्ठल ही गाणी सादर केली. महेश काळे यांच्या कार्यक्रमाला ठाणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading