घटस्थापना उद्या १ वाजेपर्यंत करण्यास हरकत नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रौत्सवास उद्यापासून सुरूवात होत असून घटस्थापना उद्या १ वाजेपर्यंत करण्यास हरकत नाही अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. उद्या म्हणजे बुधवार १० ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा असल्यानं त्यादिवशीच नवरात्रारंभ होत आहे. उद्या सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांनी सूर्योदय होत आहे. अश्विन शुक्ल प्रतिपदा उद्या सकाळी ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत असली तरी दुपारी १ वाजेपर्यंत घटस्थापना करण्यास हरकत नाही असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. सूर्योदयाला अश्विन शुक्ल प्रतिपदा असल्यानं घटस्थापनेसाठी तो दिवस महत्वाचा असल्याचंही पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading