इंडियन नॅशनल ऑटो क्रॉस चॅम्पियनशीपची अंतिम फेरी अलिकडेच ठाण्यात संपन्न झाली. फेडरेशन ऑफ मोटर्स स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली रेमण्डच्या मैदानात या स्पर्धा झाल्या. ज्यांना मोटर स्पोर्टस् मध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे प्रवेशद्वार समजले जाते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशभरातील उत्तम चालकांनी आपलं प्रदर्शन केलं. या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे टँडम ड्रिफ्टींग अॲण्ड रेस ऑफ लिजेंडस्. यावेळी भारतातील एक उत्तम चालक गौतम सिंघानिया आणि गौरव गिल यांनी यावेळी ड्रिफ्टींगचं उपस्थितांसमोर प्रदर्शन केलं. रेस ऑफ लिजेंडस् मध्ये विक्रम माथीया यांनी प्रथम, निखिल तनेजा यांनी द्वितीय आणि सागर मुथप्पा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. १४०० सीसी पर्यंतच्या स्पर्धेत अभिषेक मिश्रानं प्रथम, अचिंत्य मेहरोत्रा द्वितीय, १४०० ते साडे सोळाशे सीसी स्पर्धेत डीन मस्करन्सने प्रथम, फिलीफोस मथाईनं द्वितीय क्रमांक पटकावला. महिला गटात बानी यादवनं प्रथम तर समर्थ यादवनं द्वितीय क्रमांक पटकावला. १६५० सीसी गटात अर्जुन रावनं प्रथम क्रमांक पटकावला.
