गोवर रूबेला लसीकरणाच्या ग्रामीण भागातील मोहिमेचा शुभारंभ

गोवर रूबेला लसीकरणाच्या मोहिमेस ठाणे जिल्ह्यात सुरूवात झाली असून ग्रामीण भागातील मोहिमेचा शुभारंभ कल्याणच्या भारतीय सैनिकी विद्यालय खडवली येथून झाला. जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. ग्रामीण भागात ४ लाख ९८ हजार बालकांना लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची व्यापक प्रसिध्दी व्हावी यासाठी जी टी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिचारिकांनी पथनाट्याच्या माध्यमातून या मोहिमेची जनजागृती केली. ही मोहिम पुढील ४ ते ६ आठवडे सुरू राहणार आहे. ग्रामीण भागातील मुरबाड, अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी या ५ तालुक्यातील सर्व खाजगी, शासकीय शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच गाव, पुनर्वसित वसाहती, वीट भट्ट्या आदिवासी भाग अशा ठिकाणी फिरत्या वाहनातून लसीकरण केलं जाणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: