गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात पाच लाख 80 हजाराहून अधिक मतदारांची वाढ

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत पाच लाख 80 हजार सातशे त्र्याऐंशी मतदारांनी वाढ झाली आहे. ही माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र नार्वेकर यांनी दिली. जिल्ह्यामध्ये या निवडणुकीत जवळपास तीन लाख नविन मतदारांची भर पडल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारी विषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोल्त होते. मतदारांच्या संख्येत झालेली ही वाढ जवळपास अकरा टक्के आहे. जिल्ह्यामध्ये ठाणे कल्याण आणि भिवंडी असे लोकसभेचे तीन मतदारसंघ येतात. जिल्ह्यामध्ये एकूण 60 लाख 94 हजार 308 मतदार आहेत. यामध्ये 33 लाख 22965 पुरुष तर 27 लाख 71 हजार तीन महिला मतदार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या निवडणुकीमध्ये प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे, मतदारांना मतदान अथवा इतर कोणताही गैरप्रकार या ॲपद्वारे थेट निवडणूक विभागाला कळवता येईल, 1950 या क्रमांकावर फोन करून आपल्याला मतदान विषयक हवी ती माहिती मिळू शकणार आहे. मतदान यादीत आपला क्रमांक आहे कीं आपलं नाव आहे की नाही हेही तपासता येणार आहे असा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment

%d bloggers like this: