गेल्या दोन दिवसात तापमानात वाढ झाल्यानं अंगाची लाही लाही होणं सुरू झालं आहे. यंदा पाऊस चांगला झाला आहे मात्र गणपतीपासून पावसानं दडी मारली आहे. अगदी तुरळक प्रमाणात पाऊस झाल्यानं सध्या हवेतील उष्म्यात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून तर ही वाढ प्रकर्षानं जाणवत असून घामाच्या धाराही वाहू लागल्या आहेत. सध्या वातावरण कोरडं झालं असून यामुळं आजाराच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गणपतीपूर्वी रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे बुजवण्यात आले होते. काही ठिकाणी डांबराने तर काही ठिकाणी सिमेंटने हे खड्डे बुजवण्यात आले. मात्र पाऊस गेल्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूतून सध्या दगडाची भुकटी बाहेर पडत असून ही भुकटी हवेत उडत असल्यामुळं अनेकांना श्वसनाचे विकार जाणवत आहेत.
