खाजगी बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस विश्वनाथ विभुते यांचा जागीच मृत्यु

घोडबंदर रोडवरील कापूरबावडी भागात काल एका खाजगी बसची दुचाकीला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस विश्वनाथ विभुते यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातप्रकरणी बसचालक चंद्रेश यादव याला कापुरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. विभुते हे त्यांच्या पत्नीला कामावर सोडून पुन्हा घराच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. पाचपखाडी भागातील नामदेववाडी परिसरात विश्वनाथ विभुते हे राहात होते. त्यांची पत्नी घोडबंदर भागात कामाला असून ते दररोज तिला कामावर सोडण्यास आणि आणण्यासाठी जात असत. काल ते नेहमीप्रमाणे पत्नीला कामावर सोडून दुचाकीने पुन्हा घरी परतत असताना कापूरबावडी येथील विहंग ईन हॉटेल समोरील सिग्नलजवळ एका खासगी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यु झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading