कासारवडवली ते गायमुख या साधारणत: ३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गास मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. वडाळा, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, कासारवडवली या प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. घोडबंदरच्या पुढे होणारं नागरीकरण आणि या भागात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन गायमुख पर्यंत मेट्रो वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मेट्रो मार्ग ४ अ कासारवडवली ते गायमुख या मार्गाला काल मंजुरी देण्यात आली. या मार्गासाठी ९४९ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पुढील ३ वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट शासनानं ठेवलं आहे.
