कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्वच अधिकाऱ्यांना फेरीवल्यावर करवाईचे आदेश

रात्रीच्या वेळी प्रवाशांची घरी जाण्याची घाई, स्टेशन मधून ते बाहेर पडत नाही तोच फेरीवाल्यांनी परिसराला घातलेला गराडा असे चित्र डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर दिसून येते. रेल्वे स्टेशन बाहेर 150 मीटर परिसरात फेरीवाले बसू देऊ नयेत असा नियम असताना कल्याण डोंबिवली मध्ये या नियमांची पायमल्ली केली जात आहे. डोंबिवली स्टेशनला फेरीवाल्यांचा गराडा पडलेला आहे. त्यातूनच प्रवासी ये जा करतात ,रिक्षासाठी रांगा लावतात. नागरिकांच्या या त्रासाबाबत अनेक रेल्वे संघटना आणि राजकीय नेत्यांनी वारंवार तक्रार करून पालिका प्रशासन लक्ष देत नाही. मात्र गेल्या आठवड्यात केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांडगे याची तडकाफडकी बदली झाल्या नंतर पालिकेला नवीन आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड नावाच्या पहिल्यांदाच एक महिला आयुक्त मिळाल्या असून त्यांनी कल्याण डोंबिवली  महानगरपालिकेचा कारभार हातात घेताच, पालिकेत फेरीवाल्यासारखे येतात आणि जातात मात्र फेरीवाले हटत नाही, इच्छा असतील तर हे फेरीवाले हटतील अशा प्रकारची टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. आमदारांच्या या टीके नंतर आता महानगरपालिकेच्या महिला आयुक्त ॲक्शन मोडवर आल्या असून त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्वच अधिकाऱ्यांना फेरीवल्यावर करवाईचे आदेश दिले. या नुसार डोंबिवलीतील प्रभाग अधिकारी आणि फेरीवाले पथकाने डोंबिवली परिसरामध्ये काल सकाळपासूनच फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त घेत डोंबिवली स्टेशन परिसरातील अनधिकृत शेड जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने तोडल्या तर  रामनगर तिकीट घरासमोरील दुकानदारांनी केलेले फुटपाथवरील अतिक्रमण ही हटवले इतकेच नाही तर रात्री उशिरा पर्यंत स्टेशन परिसरात अनेक फेरीवल्याचे समान ही जप्त केले. या वेळी  पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाईला सुरूवात केल्याने अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले होते.असून काही काळ प्रवाशी आणि डोंबिवली करणी मोकळा श्वास घेतला असून नवीन आयुक्तांच्या या आदेशा नंतर  आता किती दिवस स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त आणि स्वच्छ रहातो हे पहावे लागेल.

 

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading