एका बार कौन्सिलच्या सदस्याला आता दुस-या बार कौन्सिलच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही

न्यायालयाच्या एका बार कौन्सिलच्या सदस्याला आता दुस-या बार कौन्सिलच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. या उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी ठाणे न्यायालयातही करण्यात येणार आहे. ही माहिती ठाणे बार कौन्सिलचे अध्यक्ष प्रकाश भोसले यांनी दिली. ठाणे न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ गुलाबराव गावंड आणि प्रभाकर थोरात यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. एका बार कौन्सिलचा सदस्य असलेला वकील अन्य बार कौन्सिलमध्येही सदस्यत्व स्वीकारून त्याद्वारे अनेक ठिकाणी मतदान करत असतात. त्यामुळे वन बार वन व्होट ही संकल्पना राबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली होती. त्यावर उच्च न्यायालयानं एकाच बार कौन्सिलमध्ये सदस्यांना मतदान करता येईल असे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी आता ठाणे बार कौन्सिलमध्येही होणार आहे. ठाणे बार कौन्सिलचे अध्यक्ष प्रकाश भोसले यांनी सर्व सदस्यांना तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन केलं आहे. येत्या १० जानेवारीपर्यंत विहीत नमुन्यात ठाणे बार कौन्सिलच्या सदस्यांनी आपले अर्ज सादर करायचे असून त्यानंतर मतदार यादी निश्चित केली जाईल असं प्रकाश भोसले यांनी सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: