उद्या संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत लक्ष्मीपुजनाचा मूहूर्त – दा. कृ. सोमण

उद्या लक्ष्मीपूजन असून लक्ष्मी-कुबेर पूजन हे प्रदोषकाळी केलं जातं. उद्या प्रदोषकाली आश्विन अमावास्या असल्यामुळे याच दिवशी प्रदोषकाली म्हणजे सायं. ६ वाजून २ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत  लक्ष्मी कुबेरपूजन करावयाचे आहे असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण करायचं असतं. अलक्ष्मीचं शस्त्र झाडू असल्यामुळं झाडूची पूजा केली जाते. झाडूची पूजा केल्यामुळं लक्ष्मी घरी येते आणि अलक्ष्मी घरातून निघून जाते अशी यामागे भावना असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. लक्ष्मीला स्वच्छता, प्रामाणिकपणा, नितीमत्ता अशा गोष्टी आवडतात. जिथे अशा गोष्टी वास करतात तिथे लक्ष्मी वास करते अशी कथा आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: