आयकर विभाग हा सेवा देणाराही विभाग – आशू जैन

आयकर विभाग हा नुसता आयकर गोळा करणारा विभाग नसून आता तो सेवा देणाराही विभाग होत असल्याचं मुख्य आयकर आयुक्त आशू जैन यांनी सांगितलं. करदात्यांपर्यंत पोहचण्यासाठी आयकर विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना आशु जैन यांनी आयकर विभाग आता सेवा देणारा विभाग होणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी करदात्यांना आपल्या कराचा तिसरा हफ्ता १५ डिसेंबर पूर्वी भरावा असं आवाहनही केलं. यावेळी त्यांनी आयकर विभागातर्फे दिल्या जात असलेल्या विविध सेवांची माहिती उपस्थितांना दिली. जिल्ह्यातील विविध ठिकाणहून आलेले ३०० प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आयकर विभागातर्फे यापूर्वीही ठाणे, कल्याण, पालघर अशा विविध ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी ठाण्याच्या मुख्य आयकर आयुक्तांनी ई-फायलिंग सारख्या विविध सुविधांची माहिती दिली. आयकर विभागानं पॅनकार्डाविषयी आवश्यक ती माहिती मिळावी याकरिता ४०० ठिकाणी किऑस उभे केले असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: