आपल्या सणांची माहिती मिळावी म्हणून गेली २३ वर्ष चालवले जातायत देवधर संस्कारवर्ग

नौपाडा येथे गेली २३ वर्ष देवधर संस्कार वर्ग चालवले जातात. आपल्या सणांची माहिती मिळावी यासाठी हे संस्कारवर्ग चालवले जातात. ३ ते ६ वयोगटातील विद्यार्थी आणि पालक वर्ग अतिशय उत्साहानं या वर्गात सहभागी होतात. नवरात्रीच्या ९ दिवसात विविध रंगाचे कपडे परिधान देवीची माहिती, श्लोक याबरोबरच पारंपरिक पध्दतीनं भोंडल्याचं आयोजनही या संस्कार वर्गात करण्यात आलं होतं. पौष्टीक खिरापत खाऊन मुलं आनंदानं या संस्कार वर्गात सहभागी होतात. पालकही या वर्गामध्ये उत्साहाने माहिती घेऊन साथ देतात. पुढच्या पिढीला आपल्या परंपरा समजाव्या यासाठी या संस्कार वर्गाचं आयोजन केलं जातं. पालकांचा विश्वास आणि मुलांची आवड जपत संस्कार वर्गाची पुढील वाटचाल सुरू आहे. पुढील पिढी शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ व्हावी ही यामागची धडपड असल्याचं देवधर संस्कारवर्गाच्या संचालिका मनाली देवधर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading