आपल्यातील कॉन्शिअसनेस म्हणजे जाणीव वाढवण्यासाठी अनोख्या प्रदर्शनाचं आयोजन

आपल्यातील कॉन्शिअसनेस म्हणजे जाणीव वाढवण्यासाठी अनोख्या प्रदर्शनाचं आयोजन ठाण्याच्या कलाभवनामध्ये करण्यात आलं आहे. कांदिवलीच्या हेमा बदलानी-पाटील यांनी या अनोख्या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. विश्वामध्ये अनेक भूमितीचे आकार असून त्यातून नेहमी उर्जा निर्माण होत असते. जसे वर टोक असलेल्या त्रिकोणातून मेल एनर्जी तर खाली टोक असलेल्या त्रिकोणातून फिमेल एनर्जी निर्माण होत असते. तर चौकोन असलेल्या आकारातून फौंडेशन एनर्जी निर्माण होत असते. निसर्गात असलेल्या रंगांचंही एक आगळंवेगळं महत्व आहे. या प्रदर्शनात अशाप्रकारची चित्रं प्रदर्शित करण्यात आली आहेत. हेमा बदलानी-पाटील यांना ध्यानामध्ये हे आकार आले असून ते त्यांनी चित्र स्वरूपात प्रदर्शित केले आहेत. यातून आपली जाणीव वाढू शकते असा त्यांचा दावा आहे. या चित्रांप्रमाणेच विविध रंगातील आणि विविध आकारातील शर्ट, पँट, कुर्ती असे विविध प्रकारचे कपडेही या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले आहेत. या प्रदर्शनात ३७ प्रकारची चित्रं आणि २५ ते ३० प्रकारचे कपडे हेमा बदलानी यांनी प्रदर्शित केले आहेत. ही चित्रं आपले विचार बदलण्याचं आपल्या जाणीवा वाढवण्याचं काम करतात. हेमा बदलानी या माध्यम क्षेत्रात गेली १६ वर्ष काम करत आहेत. त्या मेथा फिजिक्स आणि क्वॉन्टम फिजिक्स तसंच योगा, रेकी शिक्षक म्हणूनही काम पाहतात. औरा हिलिंग आणि साऊंड हिलर म्हणूनही त्या काम करतात. लवकरच त्यांचं संकेतस्थळ सुरू होणार असून अशाप्रकारची चित्रं तसंच कपडे त्यामुळे ऑनलाईनही खरेदी करता येणार असल्याचं हेमा बदलानी-पाटील यांनी ठाणे वार्ताशी बोलताना सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: