आज सर्वात लहान दिवस असून रात्र मोठी

२१ डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस असून रात्र मात्र मोठी आहे. आज सूर्यानं सायन मकर राशीत प्रवेश केल्याने उत्तरायणाला प्रारंभ झाला आहे. वैज्ञानिकदृष्ट्या हीच खरी मकरसंक्रांतही मानली जाते अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. सूर्यानं मकर राशीत प्रवेश केल्यामुळं आजपासून दिनमान वाढू लागणार आहे. आजची रात्र ही १३ तास ३ मिनिटांची असेल तर आजचा दिवस हा १० तास ५७ मिनिटांचा आहे अशी माहिती सोमण यांनी  दिली. आज २१ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. तर रात्र ही वर्षातील सर्वात मोठी रात्र आहे. २१ डिसेंबर रोजी सुर्य जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला ‘विंटर सोल्सस्टाईल’ असे म्हणतात. तेव्हा सूर्याचे उत्तरायण प्रारंभ होत असल्याने या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. आजपासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करत असल्याने सूर्याचे उत्तरायण सुरू होते. आजच्या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. पौराणीक कथेनुसार आजच्या दिवशी महाभारतातील भीष्मपितामहांनी आपला शरपंजर देह सोडला. त्यांना इच्छामरण प्राप्त झाल्याने या दिवशी सर्व पित्र उत्तर दिशेला स्थलांतर करतात म्हणूनच या दिवसाला ‘पित्रायण’ असे देखील म्हटले जाते. २१ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होते. तसेच २१ मार्चला दिवस आणि रात्र समान 12-12 तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम वाढून २१ जून रोजी सर्वात मोठा दिवस असेल असेही दा. कृ. सोमण यांनी सांगीतले.

Leave a Comment

%d bloggers like this: