अचानक आलेल्या गारव्याच्या लाटेमुळं ठाणेकर गारठले

सध्या अचानक आलेल्या गार वा-याच्या लाटेमुळं ठाणेकर गारठून गेले आहेत. तीन दिवसापूर्वी वातावरणात गुलाबी थंडीचा आल्हाददायक गारवा जाऊन उष्म्यात वाढ झाली होती. मात्र गेले दोन दिवस अचानक आलेल्या गार वा-यामुळे ठाणेकर चांगलेच गारठून गेले आहेत. गेल्या दोन दिवसात तापमानाचा पारा हा ५ ते ६ सेल्सिअसनं उतरला आहे. यामुळं सध्या अंगाला झोंबणा-या थंडीचा अनुभव ठाणेकरांना येत आहे. आज सकाळीही हवेत गारवा होता. उद्यापासून मात्र तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading